Wednesday, May 19, 2021 | 01:07 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान
02-May-2021 08:19 PM

| पंढरपूर | प्रतिनिधी |

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे कमळ फुलले असून, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. याठिकाणी भाजपचे समाधान अवताडे विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीपासून शेवटच्या काही फेर्‍यांपर्यंत हा सामना अगदी अटीतटीचा झाला. अखेर अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असणार्‍या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा तीन हजार 716 मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची मुद्दा केली होती. 

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक लागली. त्यामुळे आता भारत भालके यांचेच पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरची जनता साथ देते, की डाव उलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ घालते याकडे सार्‍या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर हा निकाल अवताडे यांच्या बाजूने लागला. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार असून, एकूण 524 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. गेल्या महिन्याभरात कोरोनाच्या निर्बंधांमध्येदेखील पंढरपूरसाठी या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सभेमध्ये झालेली गर्दी आणि कोरोना नियमांची पायमल्ली हा चर्चेचा आणि राजकारणाचादेखील विषय ठरला होता. त्याचवेळी भाजपाकडून देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेत्यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या विजयानंतर भाजपाया अनेक नेत्यांनी अवताडे यांचं अभिनंदन केलं आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top