Wednesday, May 19, 2021 | 02:56 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पंढरपुरात भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर
02-May-2021 12:22 PM

। पंढरपूर । प्रतिनिधी ।

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक लागली. त्यामुळे ५ राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबरोबरच पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकींच्या निकालाची महाराष्ट्रात सर्वांना उत्सुकता आहे. पंढरपुरात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात इथे थेट सामना होत आहे व स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांच्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली आहे. आतापर्यंत समाधान अवताडे यांना ५५,५५९ मत मिळाली आहेत तर भगीरथ भालके यांना ५४,६६४ मत मिळाली आहेत. त्यामुळे भगीरथ भालके ८९५ मतांनी पिछाडीवर आहेत. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top