पंढरपूर | वार्ताहर
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असावा अशी इच्छा मंगळवेढ्यातील शिवभक्तांची आहे. यासाठी पुढाकार घेतला.
गेल्या 25 वर्षांपासून होत असलेल्या शिवभक्तांच्या मागणीचा विचार कुणाकडूनच होत नव्हता. त्यानंतर मंगळवेढेकरांनी यासंबंधी सुरु केलेली सह्यांची मोहीम सुरु केली बद्दल पत्रकार हुकूम मुलाणी यांची बातमी वाचली श्री.अभिजीत पाटील यांनी तेथे पुतळा बसवण्यासाठी काय अडचण येत आहे नगरपालीका मुख्यधिकारी यांच्याकडून माहिती घेतली
त्यानंतर एक शिवभक्त म्हणून आपण पुढाकार घेतला पाहिजे असे त्यांना वाटले आणि एक भव्य अश्वरूढ पुतळा देण्याची तयारी अभिजीत पाटील यांनी दर्शवली. त्यासाठी लागणारी जागा आणि परवानगी मिळावी असे निवेदन तहसीलदार साहेब, नगराध्यक्ष मॅडम, नगरपालीका मुख्यधिकारी निशिकांत पंरचडराव साहेब तसेच ज्ञानेश्वर कोंडूभैंरी अध्यक्ष सार्वजनिक शिवजंयती मंडळ यांच्याकडे अभिजीत पाटील यांनी दिले आहे.