Tuesday, January 26, 2021 | 08:04 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

स्वेरीच्या सात विद्यार्थ्यांची भारत फोर्ज कंपनीत निवड
11-Dec-2020 03:57 PM

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भारत फोर्ज या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.फ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. पुणे येथील भारत फोर्ज या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील उमेश बटेश्‍वर गुरव, कृष्णा राजेंद्र ताटे-देशमुख, अविनाश अर्जुन देवमारे, सचिन रामचंद्र गोसावी, बालाजी विठ्ठल लांडगे, नागेश सुधाकर रोंगे व  रोहित पांडुरंग साखरे या सात विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व प्रा.एस.व्ही. दर्शने आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.  यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले आदींनी इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या या सातही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top