Wednesday, May 19, 2021 | 02:58 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीमध्ये निवड
14-Mar-2021 04:27 PM

पंढरपूर | प्रतिनिधी

येथील स्वेरी संचालित कॉलेज ऑफ फार्मसीच्या रणजितसिंग रावसाहेब चौगुले व अक्षय बाळासाहेब पाटील या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील कोप्रान फार्मास्युटिकल कंपनीत प्रोडक्शन ऑफिसर म्हणून, तर हैद्राबाद येथील ल्युटीअस फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सागर दामू पिसे व स्वप्नील शिवाजी राऊत या दोन विद्यार्थ्यांची ‘रिसर्च ट्रेनी इन प्रोडक्ट डेव्हलपमेंट’ या पदावर निवड करण्यात आलेली आहे. 

या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, शैक्षणिक समन्वयक प्रा. रामदास नाईकनवरे, प्रा. वृणाल मोरे व ट्रेंनिग व प्लेसमेंटचे विभागप्रमुख प्रा. प्रदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या चारही विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्‍वस्त, कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top