Saturday, March 06, 2021 | 01:18 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पत्रकार सुरक्षा समिती जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र सरवदे
17-Jan-2021 01:57 PM

पंढरपूर । प्रतिनिधी ।

पत्रकार सुरक्षा समिती जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे यांची निवड पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवार दि13जानेवारी रोजी श्री संत गाडगेबाबा महाराज मठ येथे निवड करण्यात आली.  

यावेळी राज्याचे सचिव  आशिष कुमार सुना यांच्या हस्ते नूतन जिल्हाध्यक्ष  रामचंद्र सरवदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंढरपूर शहराध्यक्ष यशवंत कुंभार, उपाध्यक्ष विजय कांबळे, सचिव सुरेश गायकवाड, सहसचिव विश्‍वास पाटील, खजिनदार श्रीनिवास उपळकर, प्रसिद्धीप्रमुख अमर कांबळे या नूतन पदाधिकार्‍याचाही सत्कार करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील सरवदे यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले व पंढरपूर तालुक्यास प्रथमच हा सन्मान प्राप्त झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी ,काँग्रेसचे (युवक)शहराध्यक्ष संदीप मांडवे, सागर कदम,पत्रकार राधेश बादले पाटील,राजेंद्र काळे, चैतन्य उत्पात, रामकृष्ण बिडकर,प्रकाश सरताळे, रवींद्र शेवडे, दत्ता पाटील, बाहुबली जैन, पत्रकार सुरक्षा समितीचे राज्यसचिव डॉ आशिशकुमार सुना, सोलापूर शहाराध्यक्ष बिपीन दिड्डी, बाबा काशीद, विक्रम वाघमारे ,अक्षय बबलाद आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top