Tuesday, April 13, 2021 | 12:49 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची वेबिनार संपन्न
04-Apr-2021 05:27 PM

। पंढरपूर । प्रतिनिधी ।

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात चार दिवसीय ऑनलाईन वेबिनार सिरीजचे आयोजन करण्यात आले होते. ही वेबिनार सिरीज मोठ्यात उत्साहात संपन्न झाली.

सिंहगड महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी दि. 29 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वेबिनार सिरीजमध्ये शिक्षण व औद्योगिक क्षेत्रातील तसेच एम.टेक, पी.एच. डी. धारक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन वेबिनार सिरीजमध्ये गुगल मिटच्या साह्याने सहभाग नोंदवून माहिती घेतली.

ऑनलाईन वेबिनार सिरीज आयोजित करून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर विविध नामांकित वक्त्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना रिसर्च प्रोजेक्ट्स, कंपनी नवीन तंत्रज्ञान या विषयी महत्त्वपूर्ण माहीती वेबिनार सिरीज मध्ये देण्यात आली. यामध्ये विवेक रत्नपारखी यांनी रेडिओ फ्रिकवेन्सडिझाइन युजींग ए. डी. एस. हे एनटीनाचे लोकप्रिय सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना शिकवले. श्रीनाथ बिराजदार यांनी रिसेंट टेक्नॉलॉजी इन  मशीन लर्निंग मधुन आधुनिक यांञिक श्रेणीबद्दल माहिती दिली. महेश पवार यांनी अँडव्हान्सेस इन अँटोमेशनइंडस्ट्रीज याद्वारे सदर इंडस्ट्रीयल स्थिती त्यामध्ये असणार्‍या प्रोसेसची माहीती दिली आणि डॉ. सोनल जगताप यांनी मेडिकल इमेज प्रासेसिंग फॉर ङिसिज डिटेकशन मधील वापर या विषयावर मार्गदर्शन केले. या ऑनलाईन वेबिनार सिरीज मध्ये क्रिसेल, सिमेन्स, किसाईट अशा नामवंत कंपनीतील तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.

ऑनलाईन सहभागी सर्व मान्यवरांचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे यांनी आभार मानले. हा वेबिनार सिरीज कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. ऋषिकेश देशपांडे, समन्वयक प्रा. विक्रांत जुंदळे, प्रा. प्रियांका बनकर, प्रा. सिद्धेश्‍वर गंगौडा आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top