पंढरपूर 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शनिवार दि 17 ऑक्टोबर रोजी पूरग्रस्त पंढरपूर शहराची पाहणी करून प्रशासकीय अधिकार्‍यांना तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या आहेत. 

   उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना पेक्षा असे हे वेगळे संकट आहे,या संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या निधीची गरज आहे, रस्ते,घरं, दुकाने,टपर्‍या यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात या पुरामुळे21 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, राज्यात अनेक ठिकाणी शेती, रस्ते ,दुकाने,घरे यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. पंढरपूर शहरात मोठया प्रमाणात अतिक्रमण होत असल्याचे दिसून येते, कुंभार घाटावरील दुर्घटना यामुळेच घडली.अशा नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जबाबदारी न पा प्रशासन व मुख्याधिकारी यांची होती,यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी या दुर्घटनेबाबत मुख्याधिकारी यांना जबाबदार धरून चांगलीच कानउघाडणी केली. 

  नागरिकांनीही निसर्गाशी दोन हात करताना विचार करावा, वेडे धाडस करायला जाऊ नये,यावेळी पंढरपूरचे आमदार भारत भालके,राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत शिंदे, संदीप मांडवे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.