प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकिया (कॅप) बुधवारी (दि.9)पासून सुरू झाल्या असून, या प्रक्रिया साधारणपणे जानेवारीच्या मध्यापर्यंत चालणार आहेत.फ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून स्वेरी अभियांत्रिकीमध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी ही फी रुपये 800 एवढी असून इतर सर्व प्रवर्गासाठी ती रुपये 600 एवढी आहे. सदर फी विद्यार्थी एटीएम अथवा ऑनलाईन बँकिंगच्या सहाय्याने भरू शकतात. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. धनंजय चौधरी 9860160431, प्रा. एम. एम. पवार 9545553888, डॉ. सतीश लेंडवे 9545553878, व प्रा. यु. एल. अनुसे 9168655365 तसेच थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रा.एम.ए. देशमुख 9970277150 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.