Saturday, March 06, 2021 | 12:24 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

विठ्ठलाच्या दारात फेडला अनोखा नवस
20-Jan-2021 04:04 PM

। पंढरपूर । प्रतिनिधी ।

राज्याच्या राजकारणापेक्षा गावगाड्याचं राजकारण सोपं नाही असं म्हणतात.मग ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून येण्यासाठी काही उमेदवार अनेक पर्यायांचा वापर करतात.मग त्यात साम, दाम, दंड,भेद या नितीचाही वापर केला जातो.तर काही उमेदवार निवडून येण्यासाठी देवदेवतांना नवस बोलतात.पंढरपूर तालुक्यातील सुपली गावच्या एका पठ्ठ्यानं ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तब्बल 20 किलोमीटर दंडवत घालत विठ्ठलाच्या दारात नवस फेडला.

पंढरपूर तालुक्यातील सुपली गावचे ग्रामस्थ वामन कुलकर्णी यांनी सुपली ते पंढरपूर असं तब्बल 20 किलोमीटर अंतर दंडवत घालत पूर्ण केलं आहे.सुपली ग्रामपंचायत निवडणुकीत बी.वाय.अ‍ॅग्रोचे बाळासाहेब यलमार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत हनुमान ग्रामविकास पॅनल उभा केला होता.9 सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत सर्व सदस्य हनुमान ग्रामविकास पॅनलचेच निवडून आले.ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळावा यासाठी वामन हनुमान ग्रामविकास पॅनलनं विठ्ठला चरणी साकडं घातलं होतं.हा नवस वामन कुलकर्णी यांनी पूर्ण केला आहे.त्यांनी सुपली ते पंढरपूर हे 20 किलोमीटरचं अंतर दंडवत घालून पूर्ण केलं.संत नामदेव महाराज पायरीजवळ दर्शन घेऊन त्यांनी हा नवस पूर्ण केला आहे.त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोक काय काय करतील हे सांगता येत नसल्याचंच पुन्हा दिसून आलं आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top