Friday, March 05, 2021 | 07:02 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

छगन भुजबळांना राज्यपालांकडून ऑफर?
नाशिक
03-Feb-2021 02:28 PM

नाशिक

नाशिक । वृत्तसंस्था ।

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नाशिक दौर्‍यावर आहेत. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यपाल आणि राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

सटाणा येथे संत शिरोमणी देवमामलेदार स्मारकाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी छगन भुजबळांना भाजपमध्ये येण्याची अप्रत्यक्ष ऑफर दिली. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यांची जोरदार चर्चा सुरु आहे.

माझ्यासाठी सगळेच देव मामलेदार आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी प्रथम प्रणाम करतो. भुजबळांनी संपूर्ण बळ लावलं म्हणून हे स्मारक होत आहे. त्यामुळे भुजबळही सर्वपक्षीय होवोत अशी देव मामलेदारांना प्रार्थना करा, म्हणजे सर्व भांडण संपून जाईल आणि तुम्हाला भरघोस निधी मिळेल, असं सांगत राज्यपालांनी थेट भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. राज्यपालांच्या या वक्तव्याचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top