Tuesday, January 26, 2021 | 09:07 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

अरे बापरे! पोलीस प्रशिक्षण केंद्रात कोरोनाचा शिरकाव
नाशिक
24-Dec-2020 03:19 PM

नाशिक

नाशिक । वृत्तसंस्था ।

 नाशिक शहरात कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढत आहे. कोरोनामुळे तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे महापालिका नाशिक जिल्हा तसेच महानगरपालिका प्रशासनही हादरलं आहे.

नाशिक शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल 170 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात पोलीस प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थी आणि कर्मचार्‍यांना नाशिकच्या ठक्कर डोम कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रांत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं जिल्हा प्रशासनाची धाकधूक पुन्हा एकदा वाढली आहे. त्यात काल कोरोनामुळे अवघ्या तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. बालकावर शहरातील एका खासगी रुग्णालयात आठवड्यापासून उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना बालकाची प्राणज्योत मालवली. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यामुळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्याप्रमाणे नाशिक शहरात देखील रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. राज्य सरकारनं या वेळेत संचारबंदी आदेश दिले आहे. या आदेशान्वये आता शहरात नाकाबंदी केली जाणार आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी दिली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top