Saturday, March 06, 2021 | 12:25 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

94 वे साहित्य संमेलन नाशिकला
08-Jan-2021 07:48 PM

औरंगाबाद | प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी 94 व्या मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अखेर निश्‍चित झाले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस नाशिक येथे हे संमेलन होणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी औरंगाबादमध्ये आज ही घोषणा केली. नाशिककरांशी चर्चा करून संमेलनाच्या तारखा निश्‍चित केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.

94व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते, यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारत 94व्या साहित्य संमेलनासाठी निवड झाली. दरम्यान, गेल्या वर्षीचं 93 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडलं होतं. 

 
 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top