Tuesday, April 13, 2021 | 12:29 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

नराधम बापाकडून चिमुकल्यांचा छळ
नाशिक
17-Jan-2021 06:01 PM

नाशिक

। नाशिक । वृत्तसंस्था । 

आईचं छत्र हरपलेल्या दोन लहान मुलांवर त्यांच्या पित्याकडून अनन्वित अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार इगतपुरी तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे हा अत्याचारी बाप रेल्वे पोलिसामध्ये कार्यरत आहे. राहुल विजय मोरे असं त्याचं नाव आहे.  

जन्मदात्या बापाचा अत्याचार सहन करणार्‍या या मुलांच्या आईचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. दुर्दैवानं या मुलांना जीव लावणार्‍या आजीवरही काळानं घाला घातला. त्यामुळं त्या लहान बाळाकडं लक्ष देण्यासाठी कोणीच नव्हतं. मुलांची जबाबदारी खांद्यांवर पडलेल्या बापानं दुसरं लग्न केलं. त्यानंतर दिवसेंदिवस मुलांचे हाल वाढत गेले. पोलीस बापाकडून मुलांना जबर मारहाण सुरू झाली. आज या नराधम बापानं हद्द केली. मुलांना काठीनं व हातानं जबर मारहाण केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुलांना सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केलं आहे. मुलांना प्रचंड मारहाण झाली असून, ते घाबरले असल्याचं जवळच्या नातेवाईकानी सांगितलं. या प्रकरणी राहुल मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top