नाशिक
। नाशिक । वृत्तसंस्था ।
नाशिकमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून शेजार्यांनीच बलात्कार केल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी एका महिलेसह पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आईने विश्वासात घेऊन मुलीची विचारपूस केली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.