आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये रोहित शर्मा आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. वन-डे, टी-20 प्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही रोहितने सलामीच्या जागेवर आपला हक्क सांगितला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर तीन द्विशतकांची नोंद आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफच्या मते रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावू शकतो. अशी कामगिरी करणं सोपं नसलं तरीही रोहितमध्ये ती क्षमता असल्याचं कैफने म्हटलंय. भारतीय संघाचा 19 वर्षाखालील संघाचा कर्णधार प्रियम गर्गसोबत कैफ हॅलो अ‍ॅप लाईव्ह चॅटवर गप्पा मारत होता.

टी-20 क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक कोणता खेळाडू झळकावू शकेल असं विचारलं असता कैफने लगेच रोहितचं नाव घेतलं. रोहितमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याची क्षमता आहे. त्याचा स्ट्राईक रेट नेहमी वाढत असतो. सुरुवातीला स्थिरावण्यासाठी तो थोडा वेळ घेत असेल पण 100 धावांचा टप्पा पार केल्यानंतर तो सहज द्विशतकाचा टप्पा ओलांडू शकतो. हे काम खरंतर सोपं नाही, पण रोहितमध्ये ती क्षमता आहे.

 

अवश्य वाचा