भारताचे सर्वात वयस्कर माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं आज (शनिवार) सकाळी निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. 1940 च्या दशकात ते एकूण 9 रणजी सामने खेळले होते. तसंच त्यांनी 9 रणजी सामन्यांमध्ये एकूण 277 धावा केल्या. रायजी हे मुबंईसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बडोद्याविरोधात आपला पहिला सामना खेळले होते. तसंच 1941 च्या बॉम्बे पेन्टॅग्युलरच्या हिंदुज या संघाचे अतिरिक्त खेळाडू होते.

किक्रेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रायजी यांनी लेखन केलं. व्यवसायानं ते चार्टर्ड अकाऊंटंट होते. 2016 मध्ये बी.के.गुरूदाचार यांचं निधन झालं. त्यानंतर रायजी हे देशातील सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ठरले. यावर्षी 26 जानेवारी रोजी रायजी यांनी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टिव्ह वॉ हेदेखील हजर होते.

अवश्य वाचा