Saturday, March 06, 2021 | 12:22 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धेत नानावटी उपांत्य फेरीत
मुंबई
19-Feb-2021 06:04 PM

मुंबई

। मुंबई । प्रतिनिधी ।

नानावटी हॉस्पिटलने बलाढ्य हिंदुजा हॉस्पिटलचा 9 गडी राखून पराभव केला आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नानावटी हॉस्पिटलचा सलामीवीर दिनेश पवारने 35 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी करीत लागोपाठ दुसरे अर्धशतक फटकविले. क्रीडाप्रेमी विजय येवलेकर व वैभव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुजा हॉस्पिटलचा उत्कृष्ट खेळाडू नंदू पाटीलला रुपये दोन हजार पुरस्कारासह गौरविण्यात आले.

आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित नानावटी हॉस्पिटल विरुद्ध हिंदुजा हॉस्पिटल यामधील उपांत्यपूर्व लढत विख्यात क्रीडापटू विकी गोरक्ष व क्रीडाप्रेमी शांताराम सुकथनकर यांनी शुभेच्छा देत सुरु झाली. प्रफुल तांबे (8 धावांत 3 बळी), सचिन भोसले (13 धावांत 2 बळी) व फरहान काझी (9 धावांत 1 बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे हिंदुजा हॉस्पिटल संघाला 8 बाद 87 धावांचीच मजल मारता आली. जितु परदेशी (21 धावा), विशाल पाटील (21 धावा) व नंदू पाटील (15 धावा) यांनी हिंदुजा हॉस्पिटलच्या धावसंख्येला मोठा आकार देण्याचा प्रयत्न केला.सलामीवीर दिनेश पवारच्या (नाबाद 56 धावा, 2 षटकार व 6 चौकार) प्रथमपासूनच आक्रमक फलंदाजीमुळे हिंदुजा हॉस्पिटलचे गोलंदाज हतबल झाले. दिनेश पवार व अक्षय पोवळे (17 धावा) यांनी 49 धावांची सलामी देत नानावटी हॉस्पिटल संघाला विजयासमीप नेले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top