Saturday, March 06, 2021 | 01:29 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मुंबईच्या सूर्यकुमारची भारतीय संघात निवड
मुंबई
22-Feb-2021 06:23 PM

मुंबई

मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव, युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन तसेच राहुल तेवतिया यांची इंग्लंडविरुद्धच्या पाच ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे सूर्यकुमारचे स्वप्न अखेर साकार होणार आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे फळ सूर्यकुमारला मिळाले आहे. मुंबई इंडियन्सकडून चमकदार कामगिरी करणारा किशन हा ऋषभ पंतनंतर भारतीय संघातील दुसरा यष्टीरक्षक असेल. सूर्यकुमारने ङ्गआयपीएलफच्या 13व्या पर्वात 480 तर किशनने 516 धावा केल्या होत्या. तेवतियाने राजस्थान रॉयल्सकडून शानदार कामगिरी केली होती.डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आणि मनीष पांडे यांना संघातून डच्चू देण्यात आला असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकलेला उपकर्णधार रोहित शर्माचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

भारतीय ट्वेन्टी-20 संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, इशान किशन, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्‍वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top