Tuesday, April 13, 2021 | 01:56 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

महाराष्ट्र कबड्डी संघाची उपसंघनायिका काळाच्या पडद्याआड
मुंबई
28-Feb-2021 05:33 PM

मुंबई

मुंबई | प्रतिनिधी

नवयुग क्रीडा मंडळाची सलग सहा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळलेल्या मंदा परब (सुप्रिया कदम) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. मार्च महिन्याच्या आठ तारखेला त्या पंच्याहत्तरी गाठणार होत्या. त्यांच्या पश्‍चात मुलगा प्रसाद, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. तब्बेत अत्यवस्थ झाल्यामुळे त्यांना आदल्या दिवशी सायंकाळी रुग्णालयात दाखल केले होते. पण, दुसर्‍या दिवशी सकाळी 7.15 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. मुलुंड येथील टाटा कॉलनी हिंदू स्मशानभूमीत मुलगा प्रसाद यांनी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले.

मंदा परब यांनी 1961-62 अमृतसर, 1962-63 जबलपूर, 1963-64 कोल्हापूर, 1964-65 दिल्ली, 1965-66 हैदराबाद, 1966-67 इंदोर अशा सलग सहा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. तर इंदोर येथील स्पर्धेत त्या महाराष्ट्राच्या उपसंघनायिका होत्या. 1970-71 साली त्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षिका होत्या. पायाच्या अंगठ्यावर निदान रेषा ओलांडणार्‍या त्या पहिल्या महिला खेळाडू होत्या. पाठलाग करून व बैठी लाथ मारून गडी टिपण्यात त्यांचा हातखंडा होता. डावा मध्यरक्षक असलेल्या परब किरकोळ व बारीक शरीरयष्ठीच्या असून चपळ होत्या. 2019 साली त्यांच्या या खेळाचे महत्त्व ओळखून ओम् कबड्डी प्रभोधिनीच्या वतीने त्यांना ज्येष्ठ महिला खेळाडू म्हणून गौरव केला होता.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top