Tuesday, April 13, 2021 | 12:35 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे संघ जाहीर
मुंबई
18-Mar-2021 05:02 PM

मुंबई

। मुंबई । प्रतिनिधी ।

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या विद्यमाने दि. 22 ते 25 मार्च या कालावधीत सूर्यपेठ, तेलंगणा येथे होणार्‍या 47व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपले संघ जाहीर केले. कोल्हापूरच्या तेजस पाटीलकडे मुलांच्या संघाचे, तर पुण्याच्या समृद्धी कोळेकरकडे मुलींच्या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. 

मुलांच्या संघात मुंबई उपनगर व अहमदनगर जिल्ह्याच्या 2-2 खेळाडूंनी स्थान मिळविले आहे.तर, कोल्हापूर,जालना,रत्नागिरी,औरंगाबाद, सांगली,बीड,ठाणे,पुणे या जिल्ह्याच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे. मुलींच्या संघात मुंबई उपनगर व पुणे या जिल्ह्याच्या 2-2 खेळाडूंनी संघात स्थान मिळविले आहे. तर, मुंबई शहर, औरंगाबाद,बीड,कोल्हापूर,नाशिक, रायगड,अहमदनगर,पालघर यांच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.

वाढत्या कोरोना संसर्गामुळे निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन न करता निवडक खेळाडूंना पाचारण करून त्यांची मैदानी निवड चाचणी घेण्यात आली. त्या निवड चाचणीतून हे दोन्ही संघ निवडण्यात आले.त्याकरिता दि.8 व 9 मार्च रोजी कर्नाळा स्पोर्ट्स क्लब,पनवेल,जिल्हा रायगड येथे ही चाचणी घेण्यात आली.सध्या हे दोन्ही संघ नाशिक येथे सराव करीत आहेत. गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाले होते. हे दोन्ही संघ दि. 20 मार्च रोजी नाशिक येथून मनमाड जातील. मनमाड येथून रात्री रेल्वेने स्पर्धेकरिता रवाना होतील. आज या दोन्ही संघाची घोषणा राज्य कबड्डी असो.चे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी प्रसार माध्यमाकरिता एका पत्रकाद्वारे केली.महाराष्ट्राच्या कुमार-कुमारी गटाचे संघ खालील प्रमाणे.

 कुमार गट :- तेजस पाटील (संघनायक)-कोल्हापूर,आकाश रुडले-मुंबई उपनगर,शुभम पटारे-अहमदनगर, रोहित बिन्नीवले-जालना, निलेश शिंदे-रत्नागिरी, सुरेश जाधव-औरंगाबाद, शुभम पाटील-सांगली,शुभम दिडवाघ-मुंबई उपनगर,आदित्य शिंदे-अहमदनगर,उमेश जगदाळे-बीड, शक्तीसिंग यादव-ठाणे,राहुल ढेरे-पुणे.प्रशिक्षक :- प्रशांत भाबड- नाशिक,व्यवस्थापक:-मनोज ठाकूर-पालघर.

कुमारी गट :- समृद्धी कोळेकर (संघनायिका)-पुणे,हरजीत कौर-मुंबई उपनगर,कोमल ससाणे-औरंगाबाद,ऋणाली भुवड-मुंबई शहर,शीतल मेहत्रे-बीड, मानसी रोडे-पुणे,सानिका पाटील-मुंबई उपनगर,अनुराधा पाटील-कोल्हापूर,पूजा कुमावत-नाशिक, रचना म्हात्रे- रायगड,संस्कृती शिंदे-अहमदनगर,शाहीन शेख-पालघर.प्रशिक्षिका :- गीता साखरे-कांबळे- नाशिक,व्यवस्थापिका :-वंदना कोरडे-नाशिक.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top