मुंबई

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यात आयपीएलमधील सामना दुपारी होणार आहे. या सामन्यापूर्वीच एकमेंकाना डिवचण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. सोशल मीडियावर आरसीबी संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न राजस्थान रॉयल्सने केला आहे. राजस्थानने विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्सला सामना खेळू नये यासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. राजस्थानने दोघांना एक भन्नाट ऑफर दिली आहे. या ऑफरची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. आरसीबी आणि राजस्थानचे चाहते एकमेंकांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

राजस्थान रॉयलने ट्विट करत विराट आणि डिव्हिलिअर्सला एक ऑफर दिली आहे. ट्विटमध्ये राजस्थानने म्हटलेय की, “विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्स या दोघांना वाळवंटात फिरण्यासाठी मोफत पास देत आहोत. दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसात पर्यंतच ही ऑफर वैध असेल.” राजस्थानने असं ट्विट करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

या ट्विटवर आरसीबी आणि राजस्थानच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. कोण किती अपयशी ठरलं आणि कोणता संघ तुल्यबळ, वरचढ असल्याचं सांगितलं जातेय.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने केलेल्या अक्षम्य चुका पराभवास कारणीभूत ठरल्या. त्यामुळे आता शनिवारी रंगणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रणनीती सुधारण्यावर बेंगळूरुचा भर राहील.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरुने आठपैकी पाच सामने जिंकले आहेत. या पाच विजयांत बेंगळूरुने मुंबई इंडियन्सवर ‘सुपर-ओव्हर’मध्ये मात केली होती. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सची सलामीची जोडी अपयशी ठरल्याने त्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त