Tuesday, January 26, 2021 | 09:05 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

आरटीओत बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राला आळा
मुंबई
12-Jan-2021 03:09 PM

मुंबई

 । मुंबई । वृत्तसंस्था ।

वयाची 40 वर्षे उलटल्यानंतर खासगी वाहन चालक-मालकाला लायसन्स नूतनीकरणाकरिता आरटीओत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्याकरिता अनेकांकडून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर के ले जात असल्याची बाब समोर आली आहे. हे प्रमाणपत्र तपासण्याची यंत्रणा आरटीओकडे नाही. त्याला आळा बसावा यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरशी (एनआयसी)चर्चा करून एक सॉफ्टवेअर बनवले जाणार आहे.त्यात परिवहन विभागाच्या नियुक्त डॉक्टरांकडून विकसित सॉफ्टवेअरमार्फत वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची योजना तयार केले जात असल्याची माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 18 जानेवारीपासून एक महिना रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा के ला जाणार आहे. त्याविषयी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नवीन संकल्पनेची माहिती दिली. वयाची चाळिशी उलटल्यानंतर खासगी वाहन चालक-मालकाला लायसन्स नूतनीकरण दर पाच वर्षांनी करताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.तर व्यावसायिक वाहन चालक-मालकांना सुरुवातीपासूनच दर पाच वर्षांनी हे प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. परंतु अनेक जण डोळे तपासणीसह अन्य कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता आपल्या ओळखीतील डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवतात किंवा आरटीओ कार्यालयाबाहेरील दलालांकडूनही ओळखपत्र घेऊन ते सादर केले जाते. याला आळा बसावा यासाठी केंद्राच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडे चर्चा करून एक सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रयत्न आहे. त्यात मोबाइल अ‍ॅप तयार के ला जाणार असून त्याचे लॉगिन आयडी आरटीओकडून नियुक्त डॉक्टरांकडे असेल. त्यांच्यामार्फत प्रमाणपत्र तपासून ते आरटीओला उपलब्ध के ले जाणार आहे.यासाठी दोन हजारपेक्षा जास्त डॉक्टर नियुक्त करण्याचा प्रयत्न असेल.तसेच एनआयसीकडेही सॉफ्टवेअरसाठी चर्चा सुरू असल्याचे आयुक्त ढाकणे म्हणाले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top