राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांना करोनाची लागण झाली आहे. ट्विट करत त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कदम घरीच विलगीकरणात असून उपचार घेत आहेत.

थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉ. विश्‍वजित कदम यांनी गुरुवारी करोना चाचणी केली होती. शुक्रवारी दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये संपर्कात आलेल्यांना त्यांनी चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे. संसर्गातून बरा होत सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्‍वास असल्याचंही ते म्हणाले आहेत.

अवश्य वाचा