मुंबई,

राज्य विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी होणार्‍या निवडणुकीत शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानपरिषदेच्या माजी उपाध्यक्षा डॉ.निलम गोर्‍हे याना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे रद्द झालेली निवडणूक राज्यपाल आणि राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.या निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद वाचले आहे.अन्यथा त्यांना 25 मे ला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असता.त्यावरुन राज्यात कोरोनाच्या संकटात मोठे राजकारण घडले होते.

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!