मुंबई  

 करोनाच्या काळात महाराष्ट्रातील परिस्थिती संयमानं हाताळल्याबद्दल कौतुक झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याच्या यादीत समावेश झाला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ममूड ऑफ द नेशनफ नावानं 15 जुलै ते 27 जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील ग्रामीण व शहरी भागांतील लोकांची मतं जाणून घेण्यात आली. त्यांना आपापल्या राज्यातील सरकारबद्दल प्रश्‍न विचारण्यात आले. यापूर्वी जानेवारी महिन्यात असाच सर्व्हे करण्यात आला होता. त्याच्याशी तुलना करता उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढल्याचं दिसून येतं. उद्धव चांगले काम करत असल्याचं मत 7 टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे.

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन