मुबंई 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधीमंडळात हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली. राज्यावर करोनाचं संकट असल्याने नेहमीप्रमाणे भव्य कार्यक्रम न घेता विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडला. शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता. पण उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्‍वास सोडला होता.

शपथ घेणारे सदस्य

* शिवसेना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नीलम गोर्‍हे

* भाजप - गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड

* राष्ट्रवादी - शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी

* काँग्रेस - राजेश राठोड

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!