Monday, January 18, 2021 | 04:43 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

ठाकरे सरकारचा विरोधकांना दणका
मुंबई
10-Jan-2021 08:07 PM

मुंबई

मुंबई, प्रतिनिधी

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून, त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर, वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्युरिटी रिव्ह्यू मिटींग झाली. ही मिटींग दर एक ते दोन महिन्यांमध्ये होते. कोविड काळात पोलिसांवर खूप ताण आलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांचा सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यांच्या सुरक्षेत वाढ
वकील उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. निकम यांना झेड दर्जाची सुरक्षा तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय दर्जाची सुरक्षा एस्कॉर्टसह देण्यात आली आहे.

एखाद्या व्यक्तीच्या जिवाला किती धोका आहे? यावरून सुरक्षा ठरवली जाते. नुकत्याच एका समितीच्या अहवालावरून अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षाचा आहे म्हणून सुरक्षा कमी केलेली नाही
- अनिल देशमुख, गृहमंत्री

मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार. आता राजकीय निर्णय केले जात आहेत. माझी कुठलीही तक्रार नाही, मी जनतेतला माणूस आहे, त्यामुळं माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

 
 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top