मुंबई 

विधिमंडळाचे सन 2020 चे पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरपासून आयोजित करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यंदाच्या वर्षी हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले होते. ते आता 7 सप्टेंबर रोजी होईल.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून रोजी घेण्यात येणार होते. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलून 3 ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरले होते. मात्र अद्याप कोरोनावर अपेक्षित नियंत्रण आणण्यात आले नसल्याने सप्टेंबर महिन्याच्या 7 तारखेला पावसाळी अधिवेश घेण्यात येणार आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत धर्मादाय संघटनेतील पदोन्नती साखळीत समतोल साधण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासकीय कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत  अडचणींसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेत अंतर्गत विशाल प्रकल्पांसाठी गुंतवणुकीचे आणि रोजगाराचे निकष सुधारण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही