Tuesday, April 13, 2021 | 12:43 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
मुंबई
28-Feb-2021 07:25 PM

मुंबई

मुंबई | प्रतिनिधी

पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी ( 28 फेब्रुवारी)  अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा सादर केला.

 या विषयावर मुख्यमंत्री आणि संजय राठोड यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. या प्रकरणात शिवसेनेची बदनामी होत आहे आणि निर्दोष असाल तर पुन्हा विचार करु असं उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना सांगितल्याचं समजतंय.

 विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपानं संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

 बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून थेट संजय राठोड यांच्यावर आरोप केला होता.

विरोधी पक्षाने घाणेरडं राजकारण करुन माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या प्रकरणातून सत्य बाहेर यावे, यासाठी मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

संजय राठोड,माजी वनमंत्री

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानं भागणार नाही तर त्यांना अटक करा. राठोडांचा राजीनामा या आधीच घ्यायला हवा होता.त्यांचा  राजीनामा हा लोकांचा दबाव, भाजपचे आंदोलन आणि माध्यमांनी सातत्याने लावून धरलेला विषय यामुळे घेण्यात आला आहे.

 चंद्रकांत पाटी, भाजप प्रदेशाध्यक्ष

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top