Tuesday, April 13, 2021 | 12:37 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

वाढीव वीज बिल वसुलीला तूर्तास स्थगिती
मुंबई
02-Mar-2021 08:27 PM

मुंबई

मुंबई | प्रतिनिधी

कोरोनाच्या काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरुन सभागृहात गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे सभागृहात गोंधळ सुरु झाल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्थी करत वीजतोडणीला तूर्तास स्थगिती देत असल्याची घोषण केली. जोवर विजेच्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही, तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपा आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्‍यावर आंदोलन केलं. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत भाजपानं या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेतलं. सर्वसामान्य नागरिकांच्या वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपानं केली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला.

वाढीव वीज बिल मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा घेण्याची मागणी केली. राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. करोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणलं जात आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो की, जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडणं थांबण्यात येईल. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची इच्छा आहे. त्यामुळे एक दिवस ठरवून चर्चा करू. चर्चेतून सगळ्या सदस्यांचं समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील निर्णय घेण्यात येतील, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

या निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानतो. ज्यांची वीज तोडली, त्यांच्या जोडून द्या. त्यांनाही समान न्याय द्या, अशी माझी विनंती आहे. 

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

जोपर्यंत यासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत कुणाचीही वीज तोडण्यात येणार नाही. शेतकर्‍यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडणं थांबण्यात येईल.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top