नवी मुंबई 

दिघा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अन्नू आंग्रे यांच्या पक्ष कार्यलयाचे उदघाटन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी मन5री आव्हाड यांना सन्मानाची तलवार आंग्रे यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित असलेले नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी ही तलवार गणेश नाईकांसाठी का? असे वक्तव्य केले. या वक्तव्याने मात्र नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून भाजपाकडून प्रशांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी व आ. गणेश नाईकांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची मागणी भाजपाकडून पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

  दिघा येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उदघाटनाचा कार्यक्रम रविवारी जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडला. पालिका निवडणुकांच्या दृष्टीने नवी मुंबईची जबाबदारी मंत्री जितेंद्र  आव्हाड यांच्यावर सोपवली आहे. त्यात आव्हाडांनी याधीच आ. गणेश नाईकांवर तलवारीसारख्या जिभेने आरोप केले आहेत. आ. नाईकांनी देखील आव्हाडांना प्रत्युत्तर देत कडी केलेली नवी मुंबईकरांनी अनुभवली आहे. त्यानंतर कोविडच्या संकटाने राजकीय वाद शमवला असला तरी राष्ट्रवादीच्या प्रशांत पाटील यांनी आ. गणेश नाईकांच्या विरिधात पुन्हा तलवारीची भाषा केल्याने भाजपाकडून या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार भाजपाच्या शिष्ट मंडळाकडून पोलीस आयुक्तांची बुधवार दि.23 सप्टेंबर रोजी भेट घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून आ. नाईक यांच्या सुरक्षितेत वाढ करण्याची मागणी केली आहे. मात्र या वक्तव्यावरून समाज माध्यमांवर भाजपाकडून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

:आमच्या पक्षात अनेक गणेश नाईक नावाचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांविषयी बोललो. माझ्या वक्तव्याचा ज्यांच्याशी संबंध जोडला जात आहे. ज्यांच्या नावावरून वादंग उठला आहे.  माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही त्यांच्याविषयी मी बोललेलो नाही.

 

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त