Tuesday, April 13, 2021 | 12:48 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सरकार अधिवेशनापासून दूर पळतंय
मुंबई
28-Feb-2021 07:29 PM

मुंबई

मुंबई | प्रतिनिधी

सध्या राज्याची घडी एवढी विस्कटलेली आहे, की ती कशी सावरायची हे समजत नसल्याने राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळतं आहे. अधिवेशन होऊ नये, झालं तर कमीत कमी दिवस व्हावं. त्याही दरम्यान कुठलीही चर्चा होऊ नये. अशा प्रकारची रणनिती या सरकारने बनवली आहे.  अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  रविवारी पत्रकारपरिषेदतून केली.

तसेच, राज्याचं तथाकथित अर्थसंकल्पीय अधिवेशन हे  सोमवारी  सुरू होतं आहे. मी तथाकथित यासाठी म्हटलं की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या इतिहासातील सगळ्यात लहान व पूर्णपणे कामकाजापासून पळ काढणारं अधिवेशन हे उद्यापासून सुरू होत आहे. असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

या पत्रकारपरिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,  माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची देखील उपस्थिती आहे.

हे तीन पाटाचा सरकार आहे. कोण कुठल्या पाटावर बसलय आणि कोण कुणाचा पाट ओढतय हे समजत नाही. एकमेव काम चालू आहे बदल्या आणि बदल्यांच्या बोल्या लागत आहेत. बदल्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार होतोय, 

देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top