मुंबई 

 राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एक प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं इतर राजकीय पक्षांना अनुकरणीय ठरेल असा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षांतर्गत 'एलजीबीटी' (गे, लेस्बियन, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर) सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता समलिंगी लोकही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून दिसणार आहेत.

पक्षाच्या ट्विटर हँडलवर या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे राजकीय पक्षांमध्ये महिला, ओबीसी, एस-एसटी, अल्पसंख्याक, सिनेकलाकार, कामगारांसाठी असे वेगवेगळे सेल असतात. प्रत्येक पक्षानुसार त्यांना वेगवेगळी नावे असतात. राष्ट्रवादीतही तसे सेल आहेत. आता त्यात एलजीबीटी सेलची भर पडणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार हा सेल सुरू होणार आहे. एल. जी. बी. टी. समुदायला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा नविन सेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जयंत पाटील यांच्या हस्ते व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील पक्ष कार्यालयात या सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्वीटद्वारे देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या या प्रयत्नांमुळं या समुदायातील लोकांना एक व्यासपीठ मिळू शकणार आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त