मुंबई

 राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचं सोडून द्या आणि काँग्रेस वाढवण्यावर लक्ष द्या, अशा शब्दांत शरद पवारांनी राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवारांनी राहुल यांना हा सल्ला दिला. गेल्या अनेक वर्षांपासून मी काँग्रेसला पाहत आहे. कोणी मान्य करा अथवा नका करू पण गांधीवाद ही काँग्रेसची मोठी ताकद आहे, तसं माझं निरीक्षण आहे. काँग्रेसमधील विविध गटांना एकत्रित आणण्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना यश आलेलं आहे. तसेच आता काँग्रेसनेही राहुल गांधींचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडे संपूर्ण काँग्रेसची जबाबदारी सोपवण्यात आली पाहिजे, असं माझं मत आहे. अर्थात हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, असं पवार म्हणाले.

अवश्य वाचा