मुंबई
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टिकास्त्र सोडले आहे. मफआजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपमधील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता 5 वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छूक असले तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या, असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!फफ असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेना खूप हवेत आहे. त्यांची स्वर्गाला बोटं टेकली आहेत, अशी टिका देखील त्यांनी केली होती. भाजपचे सर्व निर्णय केंद्र पातळीवर घेतले जातात. पंतप्रधान मोदींनी फॉर्म्युला तयार केला आणि तो उद्धव ठाकरे यांनी मान्य केला त्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असतील, असे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले होते. त्यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

अवश्य वाचा