Wednesday, December 02, 2020 | 11:54 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार
मुंबई
20-Nov-2020 12:29 PM

मुंबई

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढवून या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. दरम्यान या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केली होती. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यात येत असल्यामुळे संबंधित जिह्यात पालकमंत्री आणि संपर्पमंत्र्यांवर जबाबदारी आहे. महाविकास आघाडीतल्या तीन पक्षातील उत्तम संवाद आणि चांगला समन्वय यातून यात यश मिळण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा करण्याचे आदेश शरद पवार यांनी मंत्र्यांना दिल्याचे समजते.

महाविकास आघाडीतर्फे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी पाच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून श्रीकांत देशपांडे, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अरुण लाड, संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण, पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगांवकर तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top