मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणी दिलेला राजीनामा स्वीकारला आहे.या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल,जर यामध्ये राठोड दोषी आढळले तर त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी सुरु होत आहे.त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांचा समाचार घेतला.
या प्रकरणात पूजा चव्हाण हिच्या आईवडिलांनी माझी भेट घेतली आणि आपली कोणतीही तक्रार नाही असे स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या घटनेचा तपास वेगाने व्हावा आणि दोषींना तुम्ही शिक्षा कराल याबाबत आम्हाला खात्री आहे- पूजा चव्हाण हिच्या आईवडिलांनी मागणी केली आहे.त्यानुसार तसे आदेश यंत्रणेला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले. राजीनामा घेणे, गुन्हा दाखल करून मोकळा होणे म्हणजे न्याय नव्ह, संजय राठोड प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही,असेही त्यांनी सुचित केले. केवळ सत्ता नाही म्हणून आरोप करणे चुकीचे आहे,असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
संजय राठोड प्रकरणी गलिच्छ राजकारण सुरू असून, विरोधी पक्षनेत्यांनी जबाबदारीने बोलायला हवे,असे उद्धव ठाकरे म्हणाले.