Wednesday, December 02, 2020 | 12:13 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

निधीवाटपात काँग्रेसबाबत दुजाभाव -थोरात
मुंबई
19-Nov-2020 07:44 PM

मुंबई

मुंबई 

 काँग्रेसच्या काही विशिष्ट खात्यांसोबत निधी वाटपाबाबात  दुजाभाव करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  यांनी केला आहे. दरम्यान, नाराजी असली तरी चर्चेतून तोडगा निघेल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली. काँग्रेसमध्ये नाराजी नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील  दिली आहे.  

  याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण कालच बोललो आहोत असं ते म्हणाले. वीजबील माफ करण्याबाबत सरकारकडे पैसा नाही, महसूलही कमी आहे, तसंच इतर अनेक कारणं असल्याने सूट शक्य नाही असं ते म्हणालेत.

 तर निधी वाटपावरून काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचृें राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर निधी वाटप हे बसून ठरवता येते. यासंदर्भात मुख्यमंत्री सगळ्यांना बोलवून हा प्रश्‍न सोडवू शकतात, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

     

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top