मुंबई

केंद्रातील मोदी सरकार जनतेच्या विरोधातील धोरणे राबवित आहे,  या सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी केले. बुधवारी त्यांनी काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी सवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. तर याच बैठकीत केंद्रातील सत्ताधार्‍यांशी लढायचं की त्यांना घाबरून राह्यचं हे आधी ठरवलं पाहिजे, असा थेट सवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला.

या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते.

सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थितीसह लॉकडाऊनच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. उद्धवजी, तुम्ही करोना संसर्गाशी खूपच चांगलंच लढत आहात, असं ममता बॅनर्जी यांनी सांगताच, मी लढणार्‍या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे अभिनंदन केलं. तसेच सत्ताधार्‍यांविरोधात लढायचं की घाबरून राह्यचं हे ठरवलं पाहिजेत, असंही सांगितलं.

उद्या गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी मजीएसटी कौन्सिलफची बैठक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यांची थकबाकी मिळावी म्हणून जीएसटी परिषदेवर आणि पर्यायाने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठीच काँग्रेसने ही बैठक बोलावल्याचं बोललं जात आहे. तसेच देशात सक्षम विरोधी पर्याय उभा करण्यासाठीही सोनिया गांधी यांनी मित्र पक्षांना विश्‍वासात घेण्यास सुरुवात केल्याचंही बोललं जात आहे.

 

अवश्य वाचा