मुंबई 

विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे विधानसभेचे सदस्य नसताना मुख्यमंत्री झाले होते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना 6 महिन्यांच्या आत आमदार होणे आवश्यक असते. उद्धव ठाकरे यांची ती मुदत 27 मे रोजी संपत आहे. आघाडीने 6 उमेदवार दिल्यास निवडणूक झाली असती. 21 मे रोजी मतमोजणी होती. नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ घ्यावी लागते. आता निवडणूक बिनविरोध होणार असल्याने 14 मे रोजी उमेदवारांच्या निवडीची घोषणा होईल.भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, छोटे पक्ष 16, अपक्ष 1 आमदार आहेत. - एका उमेदवारास विजयी होण्यासाठी पहिल्या पसंतीची 29 मते (कोटा) आवश्यक आहेत.

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!