मुंबई

  यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात साठ वर्षांवरील आमदारांच्या उपस्थितीबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वयोगटातील सदस्यांना अधिवेशनात उपस्थित राहता येईल का याबाबत सध्या सरकार दरबारी खल सुरु आहे. कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार साठ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदारांना पावसाळी अधिवेशनात उपस्थित न राहण्याबाबत विनंती करण्याचा विचार सध्या संसदीय कामकाज विभाग आणि विधिमंडळ प्रशासन करत असल्याची माहिती समोर येत आहे.

 यासंदर्भात कामकाज सल्लागार समितीला विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींसमोर प्रस्ताव ठेवावा लागेल. यासाठी विधीमंडळ प्रशासनाकडून या वयोगटातील आमदारांची माहिती संकलित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आमदारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची छाननी करुन साठ आणि त्यावरील वयोगटातील यादी सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्यात आली आहे. यामध्ये विधानसभेतील 289 पैकी 63 आमदारांचा समावेश आहे. तर विधानपरिषदेतील 78 पैकी 18 जागा रिक्त आहेत. त्यामुळे 60 सदस्यांच्या माहितीची छाननी सुरु आहे. मात्र यातून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना वगळण्यात येणार येणार आहे.

अवश्य वाचा