मुंबई  

  बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना गुप्तेश्‍वर पांडेच्या विरोधात लढणार आहे. यामुळे आता बिहार निवडणुकीत आणखी एक ट्वीस्ट आला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला लागून आलेल्या बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये शिवसेनेची बदनामी करण्यात आली. बिहारचे माजी पोलीस संचालक यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर अविश्‍वास दाखवला होता. दरम्यान बिहारमध्ये गुप्तेश्‍वर पांडे आणि शिवसेनेत सामाना रंगणार आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलय.

 बिहार निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर गुप्तेश्‍वर पांडे यांनी सेवानिवृत्ती घेत जेडीयूमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पांडेंच्या महाराष्ट्र सरकारविरोधातली भूमिका केवळ आकसापोटी असल्याची शंका शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात झालेल्या बदनामीनंतर शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. 2015 मध्ये शिवसेनेनं 80 जागा लढवत 2 लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यंदा शिवसेना 50 जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.

 महाराष्ट्र आणि मुंबई पोलीसांवर ज्या डीजीपी पांडेनी संशय व्यक्त केला गेला होता त्याच पांडेना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झालाय, असं मत शिवसेना खासदार अनिल देसाईंनी व्यक्त केलंय.

 बिहार निवडणुकीचा निर्णय राखून ठेवल्याचे इतके दिवस खासदार संजय राऊत सांगत होते. पण आता देसाईंनी यावरील पडदा हटवला असून शिवसेना बिहार निवडणुकीत पांडे यांच्याविरोधात उतरणार हे स्पष्ट झाले आहे.

 दरम्यान बिहार निवडणुकी प्रभारी असणारे देवेंद्र फडणवीस हे गुप्तेश्‍वर पांडेंचा प्रचार करणार का ? असा प्रश्‍न करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल उपस्थित केला होता. 

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त