Thursday, December 03, 2020 | 12:28 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

लॉकडाऊनमुळे 60 कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड
मुंबई
19-Sep-2020 06:43 PM

मुंबई

मुंबई 

 लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचार्‍यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे. लॉकडाऊनमुळे तब्बल 60 लाख कर्मचारी बेरोजदार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे 60 लाख कर्मचारी बेरोजगार झाल्याचा अहवाल  सीएमआयईने दिला. त्यात हे अधोरेखीत करण्यात आले आहे.

 कोरोना व्हायरसला रोखण्याच्या उद्देशाने मार्च ते ऑगस्ट यादरम्यान  लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनमुळे 60 लाख कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. इंजिनिअर, फिजिशियन, अकाउंटंट, विश्‍लेषक आणि शिक्षक यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.

 सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात सीएमआयई या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ङ्गसीएमआयईफने म्हटलं की, सरकारने जूनमध्येच अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू केली असली तरी, सातत्याचे निर्बंध आणि स्थानिक पातळीवरील लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत अडथळे येतात. त्यामुळे रोजगाराच्या मार्गातही असेच अडथळे निर्माण झाले.

 मे-ऑगस्ट 2020 या काळात  कर्मचार्‍यांची संख्या घटून 12.2 दशलक्षांवर आली. 2016 नंतरचा हा नीचांकी आकडा आहे. 2016 सालापासून रोजगारात वाढ होत होती. मात्र लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा 2016 इतकी रोजगाराची आकडेवारी आली आहे. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top