Saturday, March 06, 2021 | 12:11 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मागील वर्षी पंचवीस हजार नागरिकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू
मुंबई
19-Feb-2021 07:06 PM

मुंबई

। मुंबई । प्रतिनिधी । 

देशभरात वायूप्रदूषणामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. 2020 मध्ये दिल्लीत 54,000 तर त्यापाठोपाठ मुंबईमध्ये 25,000 लोक प्रदूषणाचे बळी ठरले आहेत. नुकतीच ग्रीनपीस साऊथइस्ट आशियाने आकडेवारी जाहीर केली असून,त्यातून ही बाब समोर आली आहे.

भारतातील अनेक शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाची पातळी मर्यादेबाहेर गेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता असून, भारताने हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत,असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दोन वर्षांपूर्वीच दिला होता.दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ग्रीनपीस साऊथइस्ट आशियाच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये मुंबईमध्ये पंचवीस हजार मृत्यूसाठी वायू प्रदूषण कारणीभूत ठरले आहे.याविषयी अधिक माहिती देताना बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे छातीरोग-फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. जिग्नेश पटेल यांनी,भारतामध्ये मुंबई, दिल्ली,लखनौ, बंगलोर, हैद्राबाद व चेन्नई ही सहा शहरे सर्वाधिक प्रदूषित शहरे असून,दिल्ली शहरात 2020 मध्ये 54,000 नागरिकांचा मृत्यू झाला असून, मुंबईचा दुसरा नंबर असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईच नाही तर मुंबईच्या लगतच्या ठाणे, नवी मुंबई, पनवेल,पालघर शहरांचा समावेश आहे. मुंबई शहरात सुरु असलेले मेट्रोची कामे,नवीन बांधकामे, कारखान्यातून होणारे प्रदूषण व दुचाकी व चारचाकी वाहनांची झालेली अमर्याद वाढ ही कारणे मुंबई व लगतच्या शहरांमध्ये वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top