Wednesday, May 19, 2021 | 12:57 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कोरोनाची तिसरी लाट जुलै, ऑगस्टमध्ये!
मुंबई
30-Apr-2021 04:19 PM

मुंबई

 

 । मुंबई ।  प्रतिनिधी ।

राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होतोय. देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरु असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाटदेखील येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांची गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या चर्चेत ऑक्सिजन निर्माण करणार्‍या प्लांटला परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.कोरोनाची तिसरी लाट कदाचित जुलै, ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनबाबत परिपूर्ण असलं पाहिजे. तिसर्‍या लाटेआधी ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनच्या बाबत परिपूर्ण असलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट असला पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं सर्व जिल्हाधिकार्‍यांना सांगण्यात आलं आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top