Wednesday, May 19, 2021 | 01:12 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

तिसर्‍या टप्प्यातील लसीकरणाचा उडणार फज्जा?
मुंबई
30-Apr-2021 04:32 PM

मुंबई

 

। मुंबई । प्रतिनिधी ।

कोरोनाविरोधातील लढाईत लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत आहे. पण, अनेक राज्यांमध्ये लसीची उपलब्धता नसल्याने 1 मेपासून म्हणजे शनिवारपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी लसीकरण मोहिमेची तयारी नसल्याचे म्हटले आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनाविरोधी लढाईत लसीकरण हाच रामबाण उपाय असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस देण्याचा निर्णय घेतला. लसीकरण मोहिमेतला हा तिसरा टप्पा सुरु होत असताना अनेक राज्यांनी मात्र आपली तयारी नसल्याचे म्हटले आहे. लसीकरणाचा अभाव हेच यामाग हेच यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. 

लसीकरणासाठी पुरेसे डोस नसल्याने 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करता येणार नाही, असे महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने म्हटले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस गंभीर रुप घेत असताना लसीच्या तुटवड्यामुळे धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांशी संपर्क साधला असता, लसीचे डोस उपलब्ध नसल्याने 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होणार नाही. लसीचे डोस उपलब्ध होताच, ही लसीकरण मोहीम सुर होईल, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.

गुजरात सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला कोव्हिशिल्ड लसीच्या दोन कोटी डोसेस आणि भारत बायोटेकच्या 50 लाख डोसेसची ऑर्डर दिली आहे. लसीचा साठा उपलब्ध होताच येत्या पंधरा दिवसांत 18 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले.

दिल्ली सरकारने लस उत्पादक कंपन्यांशी संपर्क केला. पण, आपल्या सध्या लस उपलब्ध नसल्याचे कंपन्यांनी सांगितले. तसेच लस उपलब्ध होताच, त्याचा पुरवठा केला जाईल, असे कंपन्यांनी म्हटल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.

लसीकरण मोहिमेतील राज्यांच्या कामगिरीनुसार लसींच्या डोसेसचा पुरवठा केला जात आहे. आम्ही राज्यांना 16 कोटी डोसेसचा पुरवठा केला आहे. त्यापैकी 15 कोटी डोसेस दिले गेले आहेत. अजूनही 1 कोटी डोसेस शिल्लक आहेत. तसेच आणखी काही डोसेस येत्या दोन ते तीन दिवसांत पुरवविले जातील. लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासून लसीच्या पुरवठ्यात एक दिवसाचाही खाडा झालेला नाही, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top