कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात एका दिवसात प्रथमच 500 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 20,482 नवे रुग्ण आढळले असून, पुणे, सातारा, नाशिक, नागपूरमध्ये रुग्ण संख्या वाढतच आहे. दिवसभरात राज्यात 515जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापूर्वी 24 तासात सर्वाधिक 448 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात आतापर्यंत करोनामुळे 30,409 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित एकू ण रुग्णांची संख्या ही 10 लाख 97 हजार झाली असून, त्यापैकी 7 लाख 75 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात 2 लाख 91 हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.

 

अवश्य वाचा