Thursday, January 21, 2021 | 01:08 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

विमान क्षेत्राला कोरोनाचा फटका
मुंबई
04-Dec-2020 09:25 PM

मुंबई

सध्या करोना महासाथीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. परंतु, सर्वाधिक फटका हा विमान क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राला बसल्याचं दिसत आहे. क्रेडिट रेटिंग संस्था इक्रा लिमिटेडचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. यानुसार 2021 या आर्थिक वर्षात विमान क्षेत्राला जवळपास 21 हजार कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्‍वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विमान कंपन्यांना हा तोटा सहन करावा लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विमान कंपन्यांना आपल्या तोट्यातून तसंच कर्जातून बाहेर येण्यासाठी 2021 या आर्थिक वर्षापासून 2025 या आर्थिक वर्षापर्यंत 37 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम जाणवणार असल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांच्या संख्येवरही मोठा परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष 2022 पर्यंत लीजबाबतची देणी सोडून विमान उद्योग क्षेत्रावरील कर्ज वाढून 50 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता अहवालातून व्यक्त करण्यात आली. इंडिगो आणि स्पाईसजेट लिमिटेड यांना आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते सप्टेंबर 2020 दरम्यान दररोज 31 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. आता ते दररोज 26 कोटी रुपयांपर्यंत आलं असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top