मुंबई
। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय जनता पार्टीला विरोध करणार्या राजकीय व सामाजिक शक्ती एका मंचावर आली आहे महाराष्ट्रात नवीन इतिहास घडला आहे.अशी एकजूट राहिल्यास सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आहे. दिल्लीत अद्भुतपूर्व आंदोलन सुरु आहे. 26 जानेवारीला या आंदोलनाला दोन महिने पूर्ण होतील. आंदोलन थांबवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबून शेतकर्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा डाव शेतकर्यांनी हाणून पाडला. मोदी सरकारने लादलेले कायदे शेतकरीविरोधासह सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील आहे. रेशन व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. कामगार वर्गाला ठेचून काढण्यासाठी कामगार कायदा लागू केला आहे. अदानी, अंबानी व अन्य भांडवलदारांना सोबत घेऊन 99 टक्के जनतेची ही लढाई आहे. जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आहे.